सारा न्यूज नेटवर्क -
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे शुक्रवारी चिपळूणला द्विवार्षिक महाअधिवेशन.
सोलापूर :- भारत देशातील पहिली ISO 9001 : 2015 मानांकन तसेच महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य अशा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे २२ वे द्विवार्षिक महाअधिवेशन शुक्रवार, दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण, रत्नागिरी येथे मोठ्या थाटामाटात, भव्य-दिव्य नेत्रदीपक महाअधिवेशन सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक लोकेश चंद्र (भा.प्र.से.) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि बारई केंद्रीय अध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, प्रमुख अतिथी राजेंद्र पवार संचालक (मा.सं.) महावितरण, अभय हरणे संचालक (प्रकल्प) व खनिकर्म महानिर्मिती, श्रीमती सुचिता भिकाणे अप्पल जिल्हाधिकारी / कार्यकारी संचालक (मा.सं.) महापारेषण, आर. टी. देवकांत (केंद्रीय सरचिटणीस), संतोष घाडगे (केंद्रीय उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (केंद्रीय उपाध्यक्ष) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाअधिवेशनात तांत्रिक कामगारांचे प्रश्न, ग्राहकांच्या अडचणी, ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हाने, होणारे बदल, रिस्ट्रक्चरिंग यासोबतच, कामगार भरती, पेन्शन, अंतर्गत सुधारणेसाठी कामगारांचा सहभाग, नवीन दुरुस्ती विधेयक, कल्याणकारी योजना आदी सर्व मुद्द्यांकडे मान्यवरांचे लक्ष महाधिवेशनच्या माध्यमातून वेधण्याचा संघटनेचा मानस राहणार आहे.
चिपळूण येथील महाअधिवेशनसाठी सोलापूर जिल्ह्यातून २८० ते ३०० सभासद जाणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे प्रादेशिक संघटक तथा सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे यांनी दिली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment