Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 6, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

खंडणी प्रकरणातील पत्रकार नितीन कांबळे यास जामीन मंजूर.


सोलापूर : - शिवभोजन योजनेतील हॉटेल व्यावसायिकाकडून 2,44,500/- रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 1050 / 2025 या गुन्ह्यातील अटकेतील आरोपी / पत्रकार नितीन कांबळे यांस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा साहेबांनी 25000/ रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश केले आहेत.

यात सविस्तर हकीकत अशी की.., शिवभोजन चालक तथा हॉटेल समताचे इरफान शेख व अन्य शिवभोजन चालकांविरुद्ध तक्रारी अर्ज करून आणि अट्रॉसिटीची केसची धमकी देऊन रोख व फोन पे च्या माध्यमातून खंडणी घेतल्याच्या गुन्ह्यात नितीन कांबळे यांस 25/12/2025 रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मिळावा, म्हणून ॲड. योगेश नागनाथ पवार यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला सरकारी वकील कुरुडकर यांनी व मूळ फिर्यादीने जोरदार विरोध केला. परंतु, आरोपीचे वकील ॲड. योगेश पवार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा साहेबांनी आरोपीस जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. योगेश नागनाथ पवार आणि ॲड. दिपाली सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment