सारा न्यूज नेटवर्क -
6 जानेवारी पत्रकार दिन पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- गेल्यानऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार व पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा मंगळवार दिनांक 6 जानेवारी (पत्रकार दिन ) रोजी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिरझागालिब मुजावर दैनिक शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर दैनिक कर्मयोगी चे संपादक संजय पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके पोलीस उपनिरीक्षक अरुण फडके शिवभोजन चालक मालक संघटना अध्यक्ष सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सोलापूर येथील समाज कल्याण हॉल (रंगभवन) येथे दुपारी 12 वाजता सत्कार करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीच्या सर्व पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे.
आपले
राम हुंडारे - जिल्हा अध्यक्ष
आन्सर तांबोळी - शहर अध्यक्ष सोलापूर

No comments:
Post a Comment