Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, October 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



एम. के. युथ.फाउंडेशनचे आधारस्तंभ महेंद्र कांबळे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा;

श्री मंगलदास मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अनोखा सोहळा.. 

सोलापूर : - श्री मंगलदास क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, मजरेवाडी संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळा, सोलापूर येथे एम.के.युथ.फाउंडेशनचे आधारस्तंभ श्री. महेंद्र कांबळे यांचा ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महेंद्र कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एम.के युथ.फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. समाजातील गरजू घटकांना आधार देणे, सामाजिक कार्यात योगदान देणे आणि सेवाभावी विचारांची जोपासना करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.


मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांनी आनंदाचे क्षण विद्यार्थ्यांमध्ये वाटले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच समाजात आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते.



या वेळी महेंद्र कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी भरभरून यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

माणुसकीचा आधार, सामाजिक कार्याचा ध्यास आणि सेवाभावी वृत्तीचा वारसा जपणाऱ्या महेंद्र कांबळे यांचा ५० वा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सहवासात अविस्मरणीय ठरला. यावेळी सुत्रसंचलन व आभार विजयकुमार लोंढे यांनी केले 

संस्थेचे सचिव अरुण धोत्रे व उमाप  यांनी शुभेच्छा दिल्या तसेच एम के युथ फाऊंडेशनचे संस्थापक वीरेंद्र कांबळे सचिव शैलेंद्र कांबळे केशव कोळी यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment