सारा न्यूज नेटवर्क -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती'निमित्ताने राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
नागपूर / मुंबई:
भारतीय इतिहास प्रबोधिनी (मुंबई) आणि जवाहर विद्यार्थी गृह (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती'निमित्ताने राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा ३० जुलै रोजी ऑनलाईन स्वरूपात पार पडली होती. १० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेचा निकाल परीक्षकांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला होता. एकूण अ, ब, क आणि ड या चार गटांत ही स्पर्धा विभागलेली होती.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये किमतीचा ग्रंथसंच, उत्कृष्ट सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र; द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये किमतीचा ग्रंथसंच आणि सन्मानचिन्ह; तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये किमतीचा ग्रंथसंच आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत देशभरातून तब्बल अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या वक्तृत्व स्पर्धेचे निवडक व्हिडिओ युट्युब चॅनेलवर प्रकाशित करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रामुख्याने:
भारतीय लोकशाही संवर्धनात निवडणूक आयोगाची भूमिका
आरक्षण प्रणाली, भारतीय संविधान व कायदे
संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये
माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत
या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर सहभागी स्पर्धकांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली.
स्पर्धेत विजयी ठरलेले आणि विविध क्रमांक पटकावलेले स्पर्धक:
क्रमांक १ (Rank 1)
गट अ (Group A): अपूर्वा वृषाली सागर नांदुरकर, वेधार्थ नीलिमा प्रवीण माने, प्रणव मयुरी शंतनू जाधव
गट ब (Group B): याचिका सीमा राजेश अरोरा, स्मृती मुक्ता जगन्नाथ चव्हाणके, शुभम संगीता बाळासाहेब खरात
गट क आणि ड (Group C&D): सुमित सविता सुनील एलिंजे, वसीम इरशाद जाफर सय्यद, यशवंत संभाजी सायरे
क्रमांक २ (Rank 2)
गट अ (Group A): कल्याणी शिवकांता सतीश ढेकणे, ऋतिका कल्पना घनश्याम क्षीरसागर, दिनेश मनीषा निवृत्ती चोरमले
गट ब (Group B): भावना भाग्यश्री सोपान काटकर, ज्ञानेश्वर उषा विठ्ठलराव खाटिंग, निब्रास दिलशाद रायहान गौडा
गट क आणि ड (Group C&D): प्रा. डॉ. अरुणा रवींद्र वाघोळे, अनिल सुमन विनायकराव भालेकर, डॉ. विलास लीलाबाई दशरथ काळे
क्रमांक ३ (Rank 3)
गट अ (Group A): आफ्रिन रिहाना आरिफ पठाण, अथांग ममता विजय हेलुंडे, अथर्व अश्विनी विठ्ठल गुरव
गट ब (Group B): भाग्यश्री स्नेहा सुनील तठारे, वरद पूजा रवींद्र सोनावणे, अनुराग कामलेशा अनिलकुमार मिश्रा
गट क आणि ड (Group C&D): अरेबा शकील शेख, शुभम माधवी मंगेश सरदेसाई, ॲड. सुजित बिंदिदेवी विश्वनाथ राय
क्रमांक ४ (Rank 4)
गट अ (Group A): खुशी अनंता भालेराव, हर्षल सुजाता उमेश माने, दीपिका ऋतुजा राजेश हटकर
गट ब (Group B): राज्यवर्धन मीतू परीक्षित सिंग, सान्निध्य शामला राजेश चौधरी, उज्ज्वल ज्योती शैलेश वाजपेयी
गट क आणि ड (Group C&D): सौ. सुनीता विलास काळे, संतोष खोब्रागडे, सौ. रेखा मोहन बावने
इतर सहभागी स्पर्धक आणि त्यांचा निकाल...
सर्वाधिक सहभाग पुरस्कार (Maximum Participation Award): PDEA चे अजितदादा पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे
विशेष पारितोषिके (Special Prizes): श्रेयंश पुष्पलता भानूदास जाधव, हरिकिशन तुकारामजी हटवार, प्रथमेश माधवी मल्लप्पा दलवी.
याप्रमाणे स्पर्धक विजयी ठरले.
या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे कायदेविषयक क्षेत्रातील मान्यवर:
मा. श्री मुरलीधर गिरडकर साहेब (निवृत्त न्यायमूर्ती, मुंबई हायकोर्ट)
मा. ॲड. अभिजितजी वंजारी (विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग)
मा. ॲड. धनराजजी वंजारी (माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई)
मा. ॲड. अभिमान हाके पाटील (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय)
मा. श्री किरणजी बिडकर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर)
मा. ॲड. सुधाकर भोले (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय)
तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर:
श्री नरेंद्रकुमार दिवटे (अध्यक्ष - जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर)
मा. श्री किरणजी बिडकर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर)
प्रा. डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड)
तसेच या स्पर्धेचे आयोजक:
डॉ. वर्षा चौरे (मुंबई)
प्रा. डॉ. रमेश पिसे (नागपूर)
तसेच समस्त सहयोगी संघटनांचे पदाधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.


No comments:
Post a Comment