सारा न्यूज नेटवर्क
संवाद जनतेशी, देव यज्ञ सेवेशी
सोलापूर मनपा आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू वाय. एच. यांना केंद्र सरकारकडून 'Digital Doctor' प्रमाणपत्र
आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या कडून डॉ. पल्लोलू यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन..
सोलापूर : - सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू वाय. एच. यांना केंद्र सरकारच्या National Health Authority (NHA), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने Health Care Professional Registration मध्ये Higher Authority कडून Verify होऊन Qualified झाल्याबद्दल "Digital Doctor" प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या निमित्ताने डॉ. पल्लोलू यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व दमदार आमदार मा. श्री. देवेंद्र दादा कोठे यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन प्रमाणपत्र दाखविले.
यावेळी आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी डॉ. पल्लोलू यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रभाग क्रमांक 13 चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सत्यनारायण गुरम, नगरसेवक मा. विजय चिप्पा, माजी नगरसेवक मा. गुरुशांत धुत्तरगावकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मा. शंकर चौगुले, पायोनिअर क्लासचे संचालक मा. पाटील सर, कार्यालयीन लिपिक बल्ला, PA मा. चाबुकस्वार, ईश्वर मोगल, रोहित, कॉम्प्युटर ऑपरेटर मा. आडकी आदी उपस्थित होते.
डॉ. पल्लोलू यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.





No comments:
Post a Comment