सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारांच्या घरकुल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती पुन्हा आक्रमक..!
दिवाळीत रस्त्यावर, काळी फीत अन काळी टोपी परिधान करत जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन.
सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक १८/६/२०२५ निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजना बाबत निवेदन सादर करण्यात आले होते.पत्रकारांच्या मालकी हक्काच्या घरकुल साठी पत्रकार सुरक्षा समितीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी देखील अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती.
सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत पुढील कार्यवाही साठी मा. संचालक ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते परंतु अद्याप मा संचालक ग्रामीण गृहनिर्माण विभागाने पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुल बाबत दिलेल्या निवेदना बाबत योग्य ती कार्यवाही न केल्याने राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी दिवाळी पाडवा मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत जिल्हाधिकारी कार्यालय समोर काळी टोपी काळी फीत लावून राज्य सरकार चा निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन करण्यात आले.
पत्रकारांना हक्काचा निवारा मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार आक्रमक
संपूर्ण देशात दिवाळी सण मोठया उत्साहात साजरा होत असून जनता गोड फराळाचा स्वाद घेत असताना समाजाला दिशा दाखवणारे समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणारे अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत प्रश्नावर सातत्याने आपली परखड भूमिका मांडणारे प्रामाणिक पत्रकारांना मात्र आपल्याच हक्काच्या घरकुल बाबत काळी टोपी अन काळी फीत लावत रस्त्यावर उतरावं लागतं आहे ही बाब राज्य सरकारला नक्कीच लाजिरवाणी असून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे पत्रकार आज स्वताच्या मालकी हक्काच्या निवाऱ्या पासून वंचित असल्याची खंत यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त करत राज्य सरकार वर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त करत जोपर्यंत पत्रकारांना आपल्या हक्काचे घरकुल मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असे ठाम पणे सांगितले आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ राम हुंडारे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर दैनिक अबतकचे प्रसाद जगताप दत्तात्रय बनसोडे विक्रम आठवले श्रीनिवास पेद्दी सुधीर डोळे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment