Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 14, 2023

सोलापूर मध्ये पत्रकार सुरक्षा समितीची बैठक संपन्न, आंदोलने तीव्र करण्याचा शहर अध्यक्ष राम हुंडारे यांचा निर्धार...

सारा न्यूज नेटवर्क - 
सोलापूर (प्रतिनिधी ): पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राम हुंडारे होते. 
या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या  सर्वच वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता अधिस्वीकृती पत्रिका बाबत जाचक अटी रद्द करणे यासह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या प्रश्नावर व्यपाक आंदोलने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला
पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक लढा उभा करणार
पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले  यांनी आकमक भूमिका घेत थेट राज्य सरकार वर हल्ला चढवला राज्यातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धूळ खात पडले असून राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर व्यापक लढा उभा करून पत्रकारांचे प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही पत्रकारांच्या बैठकीत जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले यांनी दिली
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा समन्व्यक वैजिनाथ बिराजदार जिल्हा सचिव आन्सर तांबोळी (बी एस ) जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख  शहर समन्व्यक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे  शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद युनूस अत्तार दत्तात्रय धनके अबूबकार तांबोळी शुभम पाटील हर्षल गायकवाड नितीन कांबळे पांडुरंग संकपाळ गणेश लोखंडे ऋषिकेश जाधव कृष्णा पाटील इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment