Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 4, 2023

महावितरण कार्यालय सोलापूर शहर ( ई ) उपविभाग मध्ये ०४ मार्च "लाईनमन दिन" साजरा....

सारा न्यूज नेटवर्क _
 सोलापूर (प्रतिनिधी) :केंद्र शासनाने ०४ मार्च लाईनमन दिन म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात आणि महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग येथे देखील ०४ मार्च लाईनमन दिन मोठ्या थाटामाटात, आनंदी वातावरणात, तणाव विरहित, उत्साहात साजरा करण्यात आला.*
        *सर्व सर्वप्रथम अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. श्री चंद्रकांत दिघे साहेब यांनी लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर उपविभागातील सर्व शाखा अभियंता यांनी लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. नंतर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष श्री सुनील काळे यांनी लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले धडाकेबाज मनोगत व्यक्त करून उपस्थितांनमध्ये नवचेताना निर्माण केले. व इतर संघटना प्रतिनिधी यांनी देखील लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मोलाचे मनोगत व्यक्त करून जनमित्रांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. श्री चंद्रकांत दिघे साहेब व इतर शाखा अभियंता यांच्या हस्ते सर्वच लाईनमन स्तरावरील जनमित्रांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वांनी मिळून सुरक्षितता संबंधी प्रतिज्ञा घेतले. सर्वांनी एकमेकांना सुरक्षितता घेऊन काम करावे असे सांगत शुभेच्छा दिल्या.*
       *कार्यक्रमानंतर सर्वच लाईनमन जनमित्रांसाठी अल्पोपहार व चहापाणी ची सोय करण्यात आली होते. कार्यक्रम यशस्वीरित्या व चांगल्या प्रकारे पार पाडल्यामुळे सर्व लाईनमन जानममित्रांनी श्री चंद्रकांत दिघे साहेब यांचे आभार  मानून वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे आश्वासित केले.*
        *तसेच लाईनमन दिनाचे औचित्य साधून शाखा कार्यालय औद्योगिक वसाहत येथील लाईनमन जनमित्र यांना शाखा अभियंता N. T. मुजावर साहेब यांनी सुरक्षा साधने देऊन आपली नैतिकता पार पडली.*
       *याप्रसंगी श्री सुधीर ननवरे, N.T. मुजावर, अमोल पंढरे, प्रेम राठोड, पुंडलिक कुंभार, कोमल सुरवसे, सुनील काळे, नीलकंठ कांबळे, श्रीराम सरवदे, अमरनाथ शिंदे, धूळप्पा टेळे, विनोद राऊत, संभाजी रुपनर, रमेश कुंभार, प्रवीण माने पाटील, जैनुद्दीन शेख, सोमनाथ कारंडे, लक्ष्मीकांत अचलेरे, दत्तात्रय वाघमारे, गोकुळ कांबळे, दत्तात्रय नागणे, अमजद पठाण, सुनील वाघमोडे, अनिलकुमार बनसोडे, धनराज पारेकर, स्वप्नील कोरे, श्रीशैल विजापूरे, नबील शेख, भीमाशंकर इरशेट्टी, अपेक्षा बहादुरे, दिपाली कांदे, प्रमिला गायकवाड, प्रमिला सुरवसे व उपविभागातील इतर सर्व लाईनमन जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment