सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) - पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष, युवा पत्रकार राजू वग्गू यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, कार्यकारी जिल्हा अध्यक्ष बसवराज हमाले, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, संघटक गणेश निंबाळकर, रशीद शेख, विनायक जालनापुरे, दत्तात्रय बनसोडे (सर), नवनाथ गुड्डे, सुफी शेख, जैद बागवान, व्यंकटेश सुंचू, रेहमान फत्तेपूर आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment