सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर | (प्रतिनिधी) :राष्ट्रमाता रमाई भिमराव आंबेडकर, शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्त प्रबुध्द रंगभुमी, सोलापूर आयोजित व भिमपुत्र टेक्सास गायकवाड अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने शनिवार दि. ०४ मार्च २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेस्टीव्हल व भिमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिलभारतीय प्रबुध्द नाटय परिषदेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.भारतीय प्रबुध्द सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक व ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोडचे विकास प्रणेते भिमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या ५ दशकातील भिमकार्याचा सन्मान सोलापूरच्या क्रांतीभुमीत मा. फत्तेहसिंहराजे भोसले (सातारा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंबादास सैदू शिंदे हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रतनलाल सोनाग्रा, पुणे, मिलिंद कांबळे गुरुजी (कर्नाटक), प्रकाश पगारे, कामगार नेते पॅ. सुमेध जाधव, (मुंबई) व अ.भा. भिमशाहिर परिषदेचे अध्यक्ष भिमशाहिर हिरापुत्र भवार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.डॉ. आंबेडकर फेस्टीव्हल मध्ये भंते नागा प्रकाश (नागपूर) व भंते कश्यप (पारनेर) यांचे, "डॉ. आंबेडकरांच्या विचार संकल्पनेतील प्रबुध्द भारत" या विषयावर धम्म प्रवचन होणार आहे. त्याच बरोबर प्रा. विजयकुमार झुंबरे, यांचे पाली भाषेवर व्याख्यान होणार आहे. रमाई काव्य गीतगायन हा विशेष कार्यक्रम भिमशाहिर हिरापुत्र भवार, सादर करणार आहेत. भिम गीतांचा झंझावात या कार्यक्रमात कु. मानसी सलवदे, प्रा. जीवन संदिप शिंदे, पंकज शिंदे, प्रा. शंकर खळसोडे, हे सहभागी होणार आहेत. मै फातिमा बोल रहि हु हे हिंदी प्रबुध्द नाटय प्रा. प्रियंका सितासावद या सादर करणार आहेत. याच वेळी मी रमाई आंबेडकर बोलतेय हा एकपात्री नाटय प्रयोग देखील सादर होणार आहे.या फेस्टीव्हल मध्ये डॉ. किर्तीपाल गायकवाड लिखित एकच स्वप्न प्रबुध्द भारत (प्रबुध्द नाटय), भिमशाहिर हिरापुत्र भवार लिखित रमाच्या काळजाचं झालं पाणी पाणी , हा काव्य ग्रंथ कल्याण श्रावस्ती लिखित आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण, हा वैचारिक ग्रंथ, डॉ. धम्मपाल माशाळकर लिखित, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रीत पत्रे व रामजी गायकवाड लिखित काजवा हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. या पत्रकार परिषदेस भिमपुत्र टेक्सास गायकवाड, अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, कार्याध्यक्ष डॉ. यु. एफ. जानराव, स्वागताध्यक्ष डॉ. धम्मपाल माशाळकर, कोषाध्यक्ष फारूक शेख, उपाध्यक्ष अक्षय बबलाद, सरचिटणीस रामजी गायकवाड, श्रीकांत बनसोडे व सांस्कृतिक प्रमुख प्रा. प्रियंका सितासावद हे उपस्थित होते..
No comments:
Post a Comment