सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सैफुल येथे महिला दिन साजरा करण्यात आला.
सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला, सौ लक्ष्मी फुलचंद माळी यांच्या हस्ते सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले
अर्चना मॅडम यांनी आहाराविषयी योगा विषयी माहिती दिली महिलांना व स्वतः सक्षमीकरण कसं व्हावं या बाबत बचत गटा विषयी थोडक्यात माहिती दिली. योग शिक्षिका अनुराधा खारे यांनी योगा विषयी सर्व महिलांना खूप छान माहिती दिली.
त्याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना रोप देण्यात आली पर्यावरण जपण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमा प्रसंगी अर्चना मॅडम, कटारे मॅडम, सुरेखा तकत, शारदा होनमाने, नीलिमा शितोळे, सुवर्णा कटारे आदी महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment