Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 21, 2023

जागतिक चिमणी दिवस. , चिमण्याला आम्ही पाणी देतो, तुम्ही पण द्या...!

सारा न्यूज नेटवर्क -_
सोलापूर (प्रतिनिधी) :  जागतिक चिमणी दिवस इकोनेचर क्लब कडून आज विविध ठिकाणी जलपात्र देऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
इकोनेचर निसर्गसंवर्धन पर्यावरण सामाजिक सहकारी संस्था  मर्या.सोलापूर  यांच्या पुढाकाराने  सोलापूर शहर व ग्रामीण  भागात पक्ष्यांनां  पाणी पिण्यास जलपात्र वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणेच,  ह्या वर्षी चिमण्यांना  जलपात्र ठेवण्यात येत आहे. विविध ठिकाणी जलपात्र देण्यात आले 
सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जलपात्र देऊन पक्षांचे महत्त्व सांगून त्यांचे जोपासना करण्या बद्दल विद्यार्थ्यां मध्ये जनजागृती करण्यात आली त्यावेळी इकोनेचरचै मनोज देवकर, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे उपस्थित होते.


सोलापूर शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांना व त्यांच्या सहकार्‍यांना चिमणी व ईतर पक्षी यांना पिण्यासाठी  पाणी ठेवण्यासाठी जलपात्र देण्यात आले 

पोलीस आयुक्तालय सोलापूर येथे सहायक पोलीस आयुक्त प्रांजळ सोनवणे यांच्या हस्ते जलपात्र देऊन त्यांत पाणी ठेवल्यात आले. 
यावेळी इकोनेचर  क्लब सन्माननीय सदस्य  अनिता  पवार  .पत्रकार सुरक्षा समिती चे राम हुडांरे,आश्रम चे बेले ताई,प्रियांका वाघमारे, महेश देवकर मित्र परिवार ,उमाताई  दगीनाल,ब्रम्ह माशाळकर ,शासकीय अधिकारी गजानन होळकर,डॉक्टर संस्कृती वळसंगकर,रिमा पवार, वाहतूक    वरिष्ठ  पोलीस निरीक्षक  विश्वनाथ  सिद सर अनेकांचे सहकार्य  मुळे जलपात्र वाटप करण्यात येत आहे. असे इकोनेचर क्लब चे प्रमुख  डॉ मनोज देवकर यांनी सांगितले आहेत.

No comments:

Post a Comment