सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला दिनानिमित्त जाधव मॅडम यांच्या हस्ते महिलांचा फेटा बांधून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महिलांना शुभेच्छा देताना महिलांनी सक्षम व्हावे असे प्रतिपादन जाधव मॅडम यांनी केले नसीमा शेखसंधी यांनी परिवर्तन फाउंडेशन च्या कार्याची माहिती दिली व लैला जमादार यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची माहिती देऊन महिला एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले दिलखुश तांबोळी यांनी महिला दिन का साजरा करतो व महिला दिनाचे महत्त्व काय आहे याची माहिती दिली यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे सुनिताताई गायकवाड ,प्रतिभाताई चौगुले, संगीताताई शिरसागर, भारतीताई मनसावाले ,सोमय्या शेख, मनीषाताई गुरव,शिवानी पाटील जबिन शेख, मोनिका तोरणे ,मानसी वरधेकर , शालिनी प्यार्ला, नम्रता हारे, अनिता डोका,निकिता पाटील, सना तांबोळी,हसीना बागवान,शहनाज शेख, ताहेरा शेख,जयमाला राजपूत, आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment