Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 3, 2023

*संत रोहिदास विकास फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ.सुरेखाताई दिघे सह्याद्री संविधानिक 2023 राष्ट्रीय संघर्षनायिका पुरस्कार प्रदान*

सारा न्यूज नेटवर्क _
जयसिंगपूर (प्रतिनिधी) :सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंट महाराष्ट्र राज्य चा 16 वा वर्धापन दिन आणि संस्थापक अध्यक्ष कै.विलासराव वाईकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम जयसिंगपूर येथील सहकारमहर्षि कै.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये पार पडला. 
कल्याण,मुंबई येथील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच चर्मकार समाजातील संघटनेच्या देशातील पहिल्या महिला संस्थापक अध्यक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या सौ.सुरेखाताई नि. दिघे यांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय संघर्षनायिका हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.चर्मकार समाजातील अनेक अडचणीमध्ये सापडलेल्या महिलांना सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्नशील.अनेक बेरोजगार तरुण,कुटूंबांना व्यवसाय उभा करून देण्यासाठी योगदान सौ.दिघे यांच्या माध्यमातून मिळाले.या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष,कामगार नेते मा.श्री. पुंडलिक भाऊ जाधव यांच्या हस्ते व रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षक मंडळ, मुंबईचे सदस्य श्री मिलिंद शिंदे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मा.धनाजी यमकर,सिनेअभिनेते व जेष्ठ पत्रकार मा.दगडू माने,हिरकणी न्यूज कार्यकारी संपादक एड.सुशीला घाटगे-पवार, सिनेअभिनेता महाराष्ट्राचा लाडका पुढारी घनश्याम दरवडे,जेष्ठ सिनेअभिनेता मा.सुरेश भाऊ डोळस,सिनेअभिनेता बाळासाहेब पाटील, प्रसिद्ध कँमेरामन निलेश जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
संयोजक सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंटचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.गणेश वाईकर तर निमंत्रक सह्याद्री फिल्मस् चे उपाध्यक्ष मा.युवराज मोरे कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले,संचालिका मीना वाईकर, कार्याध्यक्ष दर्शन कोरडे, सचिव दिपक ढोणे यांनी पाहुणे आणि पुरस्कर्ते यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन/निवेदन प्रा.गायकवाड मँडम यांनी केले.

No comments:

Post a Comment