Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, August 4, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



निर्भीड पत्रकारितेचा गौरव.! 

युवा पत्रकार विष्णू सकट यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार.. 

कार्यसम्राट न्यूज युवा पत्रकार विष्णू सकट यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- अवघ्या अडीच दोन वर्षात तीन लाख 80  हजार वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख 80  हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही.



 कार्यसम्राट न्यूज च्या सोलापूर शहर प्रतिनिधी पदी युवा पत्रकार विष्णू सकट यांची  नियुक्ती संपादक यशवंत पवार यांनी केली होती त्यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला  तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे संघटक अरुण सिडगिद्दी सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव गणेश निंबाळकर समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी  रशीद शेख लक्ष्मण परीट आनंद मोरे जैद बागवान आसिफ काझी सह इतर पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment