सारा न्यूज नेटवर्क -
कासेगाव येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात संपन्न;
एकाच दिवशी 1323 लाभांचे वाटप
कासेगाव : - महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत मौजे कासेगाव येथे दिनांक 31 जुलै 2026 रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कासेगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य श्री. नेताजीभाऊ खंडागळे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आला. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा केला.
शिबिरात वाटप करण्यात आलेले दाखले व लाभ खालीलप्रमाणे :
• हयात दाखले - 257 • आधार कार्ड - 164 • आरोग्य विभाग - 146 • उत्पन्न दाखले - 96 • 7/12 उतारा वाटप - 62 • कृषी विभाग - 60 • 8 अ वाटप - 45 • युनिट वाढ - 240, युनिट कमी - 125 • पशुवैद्यकीय सेवा - 20 • EWS प्रमाणपत्र - 18 • संजय गांधी योजना - 17 • जातीचे दाखले - 13 • 7/12 दुरुस्ती - 12 • नवीन शिधापत्रिका - 10, नॉन क्रिमिलेअर - 10 • वय, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखले - 02
महिला व बालकल्याण विभाग :
बेबी केअर किट - 3, लेक लाडकी योजना - 2, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना - 7, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - 23, माझी कन्या भाग्यश्री योजना - 1 (FD रक्कम 25,000/-)
या शिबिरात एकूण 1323 लाभांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोमपा नगरसेवक श्री. अनंत नेता जाधव, उपविभागीय अधिकारी सोलापूर श्री. सुमित शिंदे, तहसीलदार श्री. किरण जमदाडे, कासेगाव पंचायत समिती सदस्य श्री. विजय राठोड, सरपंच यशपाल वाडकर, श्री. सोमनाथ पटणे, पं. स. गटनेता श्री. बलवान गोतसुर्वे, पं. स. सदस्य श्री. मळसिद्ध मुगळे, होटगी पं. स. सदस्या सौ. अंबिकाताई पाटील, गंगेवाडी सरपंच श्री. प्रशांत जाधव, श्री. राज साळुंखे, श्री. दशरथ कोळी, उपसरपंच श्री. शहाजन शेख, श्री. शंकर येणगुरे, श्री. मधुकर चिवरे, श्री. नाना भोसले, श्री. मनोज गुंड, श्री. प्रवीण चौगुले, श्री. दत्ता डांगे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.







No comments:
Post a Comment