Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 1, 2026

 सारा न्यूज नेटवर्क - 



स्वराज्याचे शिल्पकार लोकमान्य टिळक आणि जनतेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण अभिवादन.. 

लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.. 


सोलापूर : - नॅब संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच जनतेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या *प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार* या उपस्थित होत्या.



              कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी प्रास्ताविकातून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा वेध घेत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.

                      यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील आदर्श देशमुख, स्वप्नाली सोमासे, सात्विक गायकवाड, मेघना वाडेकर, संस्कृती सोमासे, प्रगती निलगंटी, मदीहा मुल्ला, अंकिता कुमार, सृष्टी म्हेत्रे, सोनाक्षी फटफटवाले, दिव्यांश पारधे, शिवम चिंतामणी, अर्जुन पाटोळे, गौरी मोतीवाले आणि ज्योतिबा गव्हाणे या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावरील प्रेरणादायी विचार प्रभावीपणे मांडले.



                कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रशालेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रवेश.या सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.



                    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जोतिबा काटे यांनी प्रभावीपणे केले,तर आरती बेंजरपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्याची प्रेरणा जागविण्यात आली.





No comments:

Post a Comment