Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 1, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 




 सोलापुरात पुन्हा रंगणार 'मेलडी डेझ' - आठवणींच्या सुरांतून आनंदाची अनुभूती


सोलापूर - सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे येथे सलग दोन यशस्वी कार्यक्रमांची मेजवानी दिल्यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा सोलापुरात 'मेलडी डेझ' या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


गीत, संगीत, बालपणीच्या रम्य आठवणी, पेंटिंग्ज आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रत्येक श्रोत्याला निखळ आनंद देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. धकाधकीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुख कसे शोधावे, दिवसभराच्या धावपळीत थकलेल्या मनाला आणि मेंदूला अलगद विश्रांती कशी द्यावी याचा प्रत्यय या कार्यक्रमातून येणार आहे.




ही संकल्पना सर्व वयोगटातील रसिकांसाठी असून अत्यंत वेगळी, नाविन्यपूर्ण आणि मनाला आनंद देणारी आहे.

"मेलडी डेझ म्हणजे फक्त कार्यक्रम नाही, तर आठवणी असतील, संगीत असेल, आनंद असेल आणि पुन्हा एकदा मनापासून जगण्याची अनुभूती असेल. 'आवो जी ले फिरसे' हे आमचे ब्रीद आहे," अशी माहिती आयोजिका कु. अपूर्वा शहाणे यांनी दिली.


त्यांनी पुढे भावनिक आवाहन करताना सांगितले की, आयुष्यात काही चुका नकळत होतात, पण त्यांची वेदना समोरच्या व्यक्तीला खोलवर लागते. अबोला, दुरावा आणि हरवलेला संवाद यामुळे नाती दुरावतात. प्रत्येक नात्यात चुका होतात, पण चुकांपेक्षा नाते मोठे असते. 'क्षमा विरस्य भूषणम' - माफ करणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नात्यांमधील दुरावा कमी करून पुन्हा एकदा मनमोकळेपणाने जगण्याचा संदेश देण्यात येणार आहे.


"मेलडी डेझ - आओ जीले दिलसे" या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी सहकुटुंब घ्यावा, असे आवाहन मेलडी डेझच्या आयोजिका कु. अपूर्वा शहाणे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment