Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 1, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर पोलीस आयुक्तालयातील दोन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान.. 


सोलापूर :- सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेचा गौरव म्हणून आज सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयात एका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


महाराष्ट्र क्राईम रिपोर्टरचे संचालक श्री. गणेश जाधव, मुख्य संपादक श्री. आर. डी. जाधव, अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. गंगाधर (अजय) एन. खंडागळे तसेच श्री. प्रदीप गायकवाड यांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब गायकवाड साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 तसेच पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अरविंद माने साहेब यांचाही त्यांच्या धडाडीच्या, कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.


पोलीस दलातील त्यांचे योगदान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.


या प्रसंगी दोन्ही मान्यवरांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.





No comments:

Post a Comment