सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगर पालिकेचे प्रभाग क्र. ९ चे भाजपा नगरसेवक श्री. शेखर इगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चे कार्यसम्राट व लोकाभिमुख भाजपा नगरसेवक मा. श्री. शेखर इगे यांचा सत्कार नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे नगरसेवक म्हणून श्री. शेखर इगे यांची ओळख आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांचा शाल, मानाची टोपी आणि ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना पंचशील उपरण घालून विशेष सन्मान देण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.दत्तात्रय बनसोडे, युवा विधिज्ञ आकाश इंगळे, श्री. लोहार साहेब, भारतीय जनता पार्टी उत्तर पूर्व मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बापू मस्के, युवा नेते श्री. विक्रम आठवले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "श्री. शेखर इगे यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभाग क्र. ९ मध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती यासह अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे."
सत्काराला उत्तर देताना नगरसेवक श्री. शेखर इगे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा सत्कार सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडला.



No comments:
Post a Comment