Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 1, 2026

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 



 सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांचा यांचा पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार


सोलापूर (प्रतिनिधी) :- येथील वाहतूक शाखा सोलापूर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले रवींद्रनाथ भंडारे यांची नुकतीच सदर बझार पोलीस ठाणे या ठिकाणी प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून सदर बझार पोलीस ठाणे येथे पदभार स्वीकारला आहे. पोलीस मित्र सोशल फाउंडेशन वतीने सदर बझार पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 


यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे म्हणाले की सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्या बरोबर सामाजिक सलोखा त्याच बरोबर गुंडगिरीवर नियंत्रण ठेवून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न राहील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत कायदा मोडण्याऱ्याची गय केली जाणार नाही कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असं सांगत सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत  उत्कृष्ट पोलिसिंग बरोबर जबरी चोरी घरफोडी सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील 


यावेळी पोलीस मित्र सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार  जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा संघटक  कलीम शेख सोलापूर शहर सचिव गणेश निंबाळकर कार्याध्यक्ष रशीद शेख सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे आन्सर तांबोळी अमोल कुलकर्णी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment