Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 1, 2023

प्रसिद्ध अभिनेते अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत, उपचारासाठी मुंबईत येणार...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

कराड (प्रतिनिधी) : शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग करत असताना घोड्यावरून पडून अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे नाटक महाराष्ट्रात चर्चेत आहे. या नाटकाचे प्रयोग हे वेगवेगळ्या जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडत असल्याचे दिसत होते. मात्र, या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अमोल यांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री शिवपुत्र संभाजी नाटकाचा प्रयोग सुरु होता. सगळे काही नीट सुरु असताना डॉ. अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एण्ट्री होती. त्याच दरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार होता. उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. 



कोल्हे हे घोडसवारी करत असताना घोड्याच्या मागचा पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे त्यांच्या पाठीला जर्क बसला आणि पाठीचा कणा दुखू लागला. त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्या. अशाही अवस्थेत वेदनाशमक औषधे घेऊन त्यांनी कालचा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग केला. आज महाराष्ट्र दिन असल्याने अमोल कोल्हे दुखापतीने बेजार असूनही आजही या महानाट्याचा प्रयोग करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत उपचारासाठी येणार आहेत. तशी माहिती त्यांनीच दिली आहे. मात्र यापुढील प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.



No comments:

Post a Comment