Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 1, 2023

डॉ .कुमार करजगी यांचा खिलौना मोटर्स नॅशनल मोटर्स इंडिया मोटर्स प्रीमियम मोटर्स यांच्यावतीने सन्मान...



 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर शहरातील कामगार नेते कुमार करजगी यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी कडून  'डॉक्टरेट' ही पदवी बहाल करण्यात आली.

कुमार करजगी हे एक मिल कामगार पुत्र, त्यांचे वडिल मिल कामगार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे दादांनां मिल कामगारांच्या अडचणींची लहानपणापासून जाणीव होती.त्यांच्या शैक्षणिक जिवनात त्यांना धनशेट्टी गुरुजींचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच प्रेरणेने दादांनी सामाजिक जिवनात क्रांती घडवुन आणली. जुनी मिल कामगारांचा लढा, लक्ष्मी विष्णु मिलच्या कामगारांना पेंशन देणे, त्याच बरोबर त्यांना त्यांचे हक्क मिळवून देवून गिरण‍गावात इतिहास घडविला. आपला एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेल्यानंतर देखील दादा खचले नाहीत. त्याच मुलाच्या नावे शहरात इंजिनिअरींग कॉलेज व जागतिक दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून इथल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे मानून त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल अमेरिकेतील नंबर एकचे विद्यापीठ समजले जाणाऱ्या कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीने घेतली व त्यांना त्यांच्या कार्यानिमित्त' 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. हॉटेल ताज दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात कदिर शाह, ऍम्बसी द इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान, श्रीमती.झेना चुंग, डायरेक्टर, डिप्लोमॅटस फोरम, कोरिया, डॉ.गौरव गुप्ता फाउंडर प्रेसिडेंट, ग्लोबल ट्रेड कौन्सिल, डॉ.अंजेय डीन-रिसर्च, कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, डेलेव्हर युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, प्रोफेसर डॉ.के एस राणा व्हाईस चान्सलर मेवार युनिव्हर्सिटी, डॉ.अबेद अल रझेग अबू जाझेर, मीडिया ऍडव्हाझर ऍम्बसी ऑफ पॅलेस्टिने, पॅट्रीक ओढीअँम्बो, डिप्लोमॅट केनिया हाय कमिशन, के एल गंजु,फाउंडर प्रेसिडेंट ऑफ GTTCI यांच्या उपस्थिती मध्ये कुमार करजगी यांना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल करण्यात आला होता.



 "एका मिल कामगाराच्या मुलाचा सन्मान अमेरिके सारख्या देशाकडून होतो आहे, ही तमाम सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. हा माझा सन्मान नसून  तमाम सोलापूर वासियांचा सन्मान आहे " या सन्मानामुळे सोलापूर शहराची मान उंचावली आहे. दादांच्या या यशाबद्दल सोलापूर शहरातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करित अभिनंदनाचा वर्षाव होत असून खिलौना मोटर्स नॅशनल मोटर्स इंडिया मोटर्स प्रीमियम मोटर्स यांच्यावतीने देखील एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून  डॉ कुमार करजगी यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी  खिलोना  मोटार्स चे इलियास शेख  इस्माईल शेख मास्टर  बागलकोटे  महेश कस्तुरे  बालकिषन गरग  कलीम शेख  अमर गुमटे  दत्ता शिंदे  मिलिंद शिंदे  फरण बेलीफ  नासीर चौधरी  मेहबूब पटेल   सलीम शेख  इम्रान इनामदार  नय्युम नदाफ  देविदास रामजीते दै.तुफान क्रांतीचे सोलापूर विभागीय उपसंपादक यशवंत पवार सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment