सारा न्यूज नेटवर्क
सोलापूर (प्रतिनिधी) : क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रशासन दरबारात आवाज उठवणारे आदरणीय आदर्श धडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आदर्श धडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ व बेवारस तसेच बीसी होस्टेल येथील ज्येष्ठ महिलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी झेडपी ग्रुपचे अध्यक्ष सुनील रणदिवे,भीम प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजूदा नागमोडे, आरपीआय मातंग आघाडी अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी psi रमाकांत वाघमारे, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, नितीन बनसोडे, चेतन पारदे,नागेश चौधरी, संजय कजाक वाले, प्रवीण आडम, सिद्धार्थ भंडारे, महेश साळुंखे , रवी कलसंगे, उमेश लोखंडे, नंदकिशोर दीडवाणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी आपल्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करता अनाथ व बेवारस लोकांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी विजुदा नागमोडे व सुनील रणदिवे यांनी आदर्श धडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment