सारा न्यूज नेटवर्क
रत्नागिरी (प्रतिनिधी) : घराडी बौद्धजन ग्रामस्थ विकास मंडळ( रजि. ) मुंबई तसेच बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्र. ४ मौजे गाव घराडी यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांच्या संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी ग्रामीण भावकीचे अध्यक्ष आयु. अशोक येशू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने लुंबिनी बौद्ध विहार मौजे गाव घराडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण ( स्थापना) करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे दिवंगत सहदेव बाबाजी लोखंडे (रोविलकर), यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयश्री (देवकुबाई) महादेव लोखंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली आणि ज्येष्ठ सभासदांच्या सत्कार समारंभ व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले, दुपारी उपस्थित लोकांना भोजनदान करण्यात आले, संध्याकाळी आयुष्यमान सचिन शिर्के( प्रचारक बामसेफ महाराष्ट्र राज्य) यांचे प्रवचन झाले, तद्नंतर स्थानिक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आयु. मिलिंद सहदेव लोखंडे (रोविलकर) एअर इंडिया एम.सी.एम.टी असोसिएशन मुंबई. मा.आयु.नितीन सहदेव लोखंडे (रोविलकर) यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई भावकी कार्यकर्ते अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सचिव मिलिंद जाधव, उपसचिव लोकेशनवर जाधव,खजिनदार सचिन जाधव, हिशोबतपासननिस दिपक जाधव व इतर सर्व कार्यकर्ते सभासद मंडळी यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापक घराडी बौद्धजन ग्रामस्थ विकास मंडळ( रजि.) मुंबई, बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्र. ४ मौजे गाव घराडी व रमाई महिला मंडळ आणि भीमज्योत तरुण मंडळ घराडी यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment