Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 3, 2023

कुंभारी हद्दीतील मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा.! मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार दाखल...

 



सारा न्यूज नेटवर्क-

सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील गट नंबर 553/1अ  २/अ १बी या ठिकाणी व कुंभारी हद्दीतील अनेक ठिकाणी मुरूम उपसा करणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करा. ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख ने आज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन द्वारे तक्रार केली आहे. व तसेच याच मागणीचा निवेदन पुणे विभागीय आयुक्त यांना पोस्ट करून पाठवण्यात आला आहे.



या निवेदन मध्ये ह्युमन राईट फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सादिक शेख यांनी दहा मे पर्यंत मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे .जर 10 मे च्या आत कारवाई नाही झाली तर दहा मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा सादिक शेख यांनी दिला आहे.

त्यावेळी ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी श्रीकांत कोळी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सोलापूर प्रचार प्रसारक बाळकृष्ण सदाफुले उपस्थित होते.




No comments:

Post a Comment