सारा न्यूज नेटवर्क -
भीषण अपघात..! सोलापुरातील दोघांचा तेरामैल जवळ मृत्यू
सोलापूर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर 13 मैल जवळ दुचाकी थेट पुलाखाली कोसळून दोघांचा मृत्यू
वार ÷गुरुवरदि . 11/6/26
प्रतिनिधी (दक्षिण सोलापूर) :- सोलापूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरामैल जवळच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भरवेगात मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना,छोट्या पुलावरून गाडीसोबत दोघेजण खाली कोसळले तर,यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा सोलापूरला उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला. हा अपघात काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.
*नाव**÷ विजय गोकुळसिंग लंगडेवाले (वय 52)
*राहणार **÷ हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका, सोलापूर
*नाव*÷ श्याम सिद्राम भोसले (वय 57)
*राहणार*÷ भिमाई नगर, माशाळ वस्ती, सोलापूर असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मंद्रुप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती अशी की, विजय लंगडेवाले व श्याम सिद्राम भोसले हे दोघेजण मोटरसायकल (MH-13- EU-4095) वरुन सोलापूरहून टाकळी या गावात बांधकामाचे काम पाहण्यासाठी गेले होते. तेथील काम पाहून झाल्यानंतर ते परत सोलापूरकडे जात असताना नांदणी गावासमोरील टोल नाका ओलांडून ते पुढे आले. तेव्हा भरधाव वेगात असलेली मोटार सायकल रिलायन्स पेट्रोल पंपाच्या अलीकडे असलेल्या एका छोट्या पुलावरून खाली कोसळले . त्यावेळी दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. गंभीर जखमी झाल्याने विजय लंगडेवाले यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्याम भोसले याचा उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, ग्रेड पीएसआय संदीप काशीद, पोलीस संदीप काळे व माजिद शेख हे घटनास्थळी गेले. त्यांनी महामार्गावरील ॲम्बुलन्स मधून जखमी भोसले यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. तर जागीच मृत्यू झालेले विजय लंगडेवाले यांचा मृतदेह मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
*विजय लंगडेवाले यांचा परिवार*,
पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी व पाच भाऊ असा परिवार आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ राम हुंडारे
No comments:
Post a Comment