सारा न्यूज नेटवर्क -
धक्कादायक! नात्याला काळीमा!
"काकाने केला,चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून ", पोलिसांकडून आरोपीला अटक....
वार ÷शुक्रवार दि. 6/6/26
प्रतिनिधी दक्षिण सोलापूर :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील
बरुर येथे, अज्ञात कारणावरून काकाने आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.
समर्थ यल्लाप्पा कास्तार (वय 5 रा- मूळगाव अंजूटगी (ता, इंडी, जिल्हा विजापूर,हल्ली बरुर)असे खून झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचा काका अंकुश परसाप्पा कास्तार (वय 25)रा. बरुर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, समर्थ हा मुलगा बरूर येथील त्याच्या आजी शोभा बगले यांच्याकडे राहत होता. तर त्याचा काका अंकुश हा देखील त्यांच्या घराशेजारी राहत होता. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अंकुश याने समर्थ याला घरी बोलावले. तेव्हा काकाकडे जातो असे सांगून तो घरातून बाहेर गेला.
थोड्यावेळाने अंकुश याने बेशुद्ध अवस्थेत समर्थला उचलून आणले.
तो पत्र्यावरून पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्यावर व व्हनवूटीला जखमा झालेल्या दिसल्या, तसेच गळ्यावर व मानेवर काळे वण पडले होते. समर्थ याला त्यानंतर तातडीने सोलापूरच्या खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. खासगी दवाखान्यात तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेऊन शवाविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये समर्थ याला गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळेस संशयित आरोपी समर्थ याचा, काका अंकुश कास्तार याला ताब्यात घेण्यात आले .
आरोपी अंकुश कास्तार (काका) ने चिमुकल्या समर्थ याचा कोणत्या कारणाने गळा आवळून खून केला याचा तपास मंद्रुप पोलीस करीत आहेत. याप्रकरणी आजी शोभा बगले यांनी फिर्यादी मध्ये सांगितलं आहे. तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे

No comments:
Post a Comment