Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, June 11, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर : महावितरणच्या नविन कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेकडून उत्साहात स्वागत


सोलापूर, दि. १० जून २०२६ : - महावितरण सोलापूर शहर विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी नुकतेच रुजू झालेले मा. श्री. विनायक इदाते यांचे आज विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) च्या वतीने पुष्पगुच्छ व ‘तांत्रिक रोजनिशी २०२६’ देऊन उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे पुणे प्रादेशिक संघटक सुनिल काळे, सोलापूर मंडळ उपाध्यक्ष अनिलकुमार बनसोडे, सोलापूर शहर विभाग अध्यक्ष अमोल धायगोडे, उपाध्यक्ष मयुर गवते, सचिव संजय फताटे, सहसचिव शिवलिंगप्पा हारगेरी यांच्यासह संघटक दत्ता कांबळे, संजय स्वामी, सतिश शिरसट, श्रीराम सरवदे आदी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नव्याने पदभार स्वीकारलेल्या श्री. इदाते यांना शुभेच्छा देताना, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री. इदाते यांनीही सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकसेवा व तांत्रिक कामकाज अधिक गतिमान करण्याचा विश्वास यावेळी दिला. 

कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment