सारा न्यूज नेटवर्क -
"नॅब सोलापूरचे सर्व विभाग एकत्र — स्नेहसंमेलनाचा अविस्मरणीय सोहळा”
“दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उजळले नॅबचे भव्य स्नेहसंमेलन”
सोलापूर :- नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) शाखा सोलापूरच्या सर्व विभागांचा *वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26* हा नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा.श्री.प्रकाशजी यलगूलवार साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम दिनांक *10 डिसेंबर 2025* रोजी जल्लोषात पार पडला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेले वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाने संपूर्ण परिसर रंगून गेला होता. स्नेहसंमेलनाचे *अध्यक्षस्थान* नॅब संस्थेच्या उपाध्यक्षा *सौ.अनुगीता पवार* यांनी भूषविले तर *प्रमुख पाहुणे* म्हणून *उपायुक्त* , गुन्हे शाखा सोलापूरचे *सौ.डॉ.अश्विनी पाटील* व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी *मा.श्री. मनोज राऊत** हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते *मातोश्री चंद्रभागाबाई यलगूलवार आणि डॉ. हेलन केलर* यांच्या *प्रतिमेस* पुष्पांजली अर्पण करून तसेच *द्विपप्रज्वलन* करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला नॅब संस्थेचे सेक्रेटरी *मा. श्री. शशिभूषण यलगूलवार* सर, स्नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्षा *सौ.सीमाताई यलगूलवार मॅडम* तसेच नॅब संस्थेच्या *पदाधिकाऱ्यांमध्ये* उपाध्यक्ष श्री.अंकुश कदम, श्री. किशोर देशपांडे, ममता मूकबधिरचे माजी मुख्याध्यापिका सौ.माधुरी शिंगाडे मॅडम व चंद्रभागाबाई यलगूलवार प्रशालाचे माजी प्राचार्य श्री.नरसिंह आसादे सर व **विभाग प्रमुखामध्ये* श्री. रामचंद्र कुलकर्णी, डॉ.हनुमंत नारायणकर, श्री. संतोष माशाळे, श्रीमती गुंडे मॅडम, श्री. सौरभ शिंगाडे, श्री. विशाल शिंदे, श्री. बंडोपंत पाटील आणि प्रा. जोतिबा काटे सर आदि मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे *प्रास्ताविक* कार्याध्यक्षा *सौ. सीमाताई यलगूलवार मॅडम* यांनी केले तर मनमोहक *सूत्रसंचालनाची* जबाबदारी *श्री.खंडू शिंदे* सर यांनी समर्थपणे पार पाडली. यावेळी *श्री. रामचंद्र कुलकर्णी सर* यांनी *मा. मनोज राऊत सर* यांच्या कार्याचा परिचय सादर केला आणि
*प्रा. जोतिबा काटे सर* यांनी *डॉ.अस्मिता पाटील* यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती उपस्थितांसमोर मांडली.नॅबच्या चंद्रभागाबाई प्राथमिक, प्रशाला व जुनिअर कॉलेज, एकात्मिक शिक्षण विभाग, डेफ-ब्लाइंड विभाग, ममता मूकबधिर विद्यालय, राजीव गांधी मेमोरियल ब्लाइंड स्कूल, मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि सोलापूर अंध कार्यशाळा या विभागांतील विद्यार्थ्यांनी *गाणी, नृत्य, नाटक अशा विविध सांस्कृतिक कलांचे रंगतदार* सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमात वर्षभर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या *गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान* करण्यात आला. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या व्यासपीठाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व विभागातील *शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी* मनापासून परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप श्री *. संतोष माशाळे सर* यांच्या *आभारप्रदर्शनाने* झाला. उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण नॅब परिवाराच्या उत्साहामुळे स्नेहसंमेलन 2025-26 अविस्मरणीय ठरले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment