सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुखपदी निवड.!
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट ) सोलापूर महानगरपालिका निवडणूक नियोजन व प्रचार प्रमुखपदी सुधीर खरटमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे नियुक्तिपत्र काढले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सुधीर खरटमल यांच्यावर सोपविण्यात आल्याचे नियुक्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सुधीर खरटमल यांची प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस प्रदेश समितीकडे केली होती.
त्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र जारी केले. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना खरटमल यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षामध्येही कार्यरत होते. आता पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment