सारा न्यूज नेटवर्क -
संयुक्त विकास आघाडीत आणखीन दोन मित्र पक्ष सामील..
सोलापूर दि. 26.12.2025 :- सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५-२०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यापूर्वी सहा पक्षाने एकत्र येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली त्यात आणखी दोन पक्षांचा समावेश झाल्याची माहिती निमंत्रक विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भी महायुती, महाविकास आघाडी या सत्ताधाऱ्यांनी विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यात यापूर्वी जनविकास क्रांतीसेना, भारतीय काँग्रेस पक्ष, लेबर पार्टी, जनशक्ती काँग्रेस पक्ष, आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्ष, समाजवादी पक्ष या सहा राजकीय पक्षांनी एकत्रित आले त्यात आणखी तीन पक्ष समाविष्ट झाले असून, परिवर्तन समता पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक व राष्ट्रीय जनमंच पक्ष (S)या पक्षांचा समावेश झाला असल्याचे संयुक्त विकास आघाडीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
**************************
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment