Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, December 2, 2025

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

🍁 स्वामी विवेकानंद प्रशालेत आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे थाटात उदघाटन 🍁


 सोलापूर (प्रतिनिधी) :- नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे  शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन   प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते थाटात करण्यात आले. 


याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून *मा.प्रा.नरसिंह असादे, उपाध्यक्ष- शहर कुस्तीगीर परिषद, सोलापूर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर सर  उपस्थित होते. 



प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन* करून मान्यवरांच्या उपस्थितीत  क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले . या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, तसेच ऍथलेटिक्स या सर्व स्पर्धा प्रशालेत घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत आज हॉलीबॉल, कबड्डी या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 







प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतात  *क्रीडा स्पर्धांचे महत्व, खेळातील उत्तम संधी,  खेळामुळे आरोग्य कसे उत्तम राहते* याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक उज्वला हिंगमिरे ,संजय राठोड, गणपती कोळी, खंडू शिंदे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक मा. सुभाष माने यांनी केले तर आभार मा. मच्छिंद्र सपताळे यांनी मानले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment