सारा न्यूज नेटवर्क -
चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली..
सोलापूर(प्रतिनिधी) : - चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार,मानवतावादी विचारवंत आणि सामाजिक समतेचे दूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना सश्रद्ध आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली, आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.बाबासाहेबांनी संपूर्ण जगाच्या विचारांची दिशा बदलण्याचे काम शिक्षणाच्या बळावर केले,आणि संपूर्ण शिक्षण हे आत्मविश्वासाच्या बळावर केले. हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही व ज्ञान हेच माणसाला उत्कर्षाकडे घेऊन जाते हा,बाबासाहेब आंबेडकरांचा विचार विद्यार्थ्यांना यावेळी विशद केला.जीवनामध्ये आत्मविश्वास हीच फार मोठी दैवी शक्ती असते,हे बाबासाहेबांचे म्हणणे विद्यार्थ्यांना सांगितले. समता,बंधुता,न्याय आणि स्वातंत्र्य या संविधानिक मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकजण आपले योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment