सारा न्यूज नेटवर्क -
मागास समाज सेवा मंडळ संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूल येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा सप्ताहाचे आयोजन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- मागास समाज सेवा मंडळ संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूल सोलापूर येथे आज दिनांक 22/12/ 2025 रोजी 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कार्तिक चव्हाण होते. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महासिद्ध म्हमाणे व प्रमुख पाहुणे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पी.एस.आय सौ अनिता जाधव व त्यांचे सहकारी सौ जयश्री गुंड तसेच प्रभागाचे माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले व पालक रमेश अड्डाकुल सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दलित मित्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांचा परिचय सौ पवार मॅडम यांनी करून दिला. व प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक देशमाने सरांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कार्तिक चव्हाण व प्रमुख पाहुणे सौ जाधव मॅडम आणि गुंड मॅडम, भारतसिंग बडूरवाले सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री गणेश राठोड सर यांनी केले व आभार श्री कदम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment