सारा न्यूज नेटवर्क -
संवेदनशील आणि सजक पत्रकार घडवणे हेच आमच्या महाविद्यालयाचे ध्येय -- प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड
DMCJ पत्रकारिता अभ्यासक्रमास दमदार सुरुवात..
सोलापूर :- महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करताना समाजहितासाठी सजग संवेदनशील आणि जबाबदार पत्रकार घडवणे हेच आमच्या महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केले.
शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मान्यतेने विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र द्वारा भाई छत्रुसिंह चंदले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पत्रकारिता अभ्यासक्रमाचा ऑनलाइन शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी रवि देवकर, प्रा. विजयकुमार लोंढे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक आणि प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य गायकवाड म्हणाले, या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. ते आज वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेषतः महिलांना घरबसल्या शिक्षण देऊन अपुरी स्वप्ने पूर्ण केलेली आहेत. आजतागायत महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के असल्याचे मत प्राचार्य गायकवाड यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे तसेच विद्यार्थ्यांचे शब्दरूपाने स्वागत करण्यात आले. यामध्ये शिक्षक, प्राध्यापक, कार्यरत पत्रकार व्यवसायिक तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
फोटो
चौकट ; पत्रकारिता ही सत्याची लढाई आहे. बातमी लिहिताना शुद्धलेखन, अचूक माहिती, आणि निर्भीड मांडणी आवश्यक असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराची भूमिका समाजासाठी दिशादर्शक ठरते.
प्रमुख वक्ते... रवि देवकर
चौकट ; पत्रकारिता ही वैयक्तिक लाभासाठी नसून समाजाच्या हितासाठी केली पाहिजे. सत्य, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यावर आधारित पत्रकारितेची आज समाजाला नितांत गरज आहे. पत्रकारितेचा फायदा स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी करावा, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
प्रा. विजयकुमार लोंढे
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा माजी महापौर नलिनी चंदेले, केंद्र सचिवा मनीषा पाटील, केंद्र सहाय्यक विशाल पाटील, सहाय्यक केशव कोळी यांनीही नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मनोभावे शुभेच्छा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment