Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 8, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापुरात दाखला लूट व अतिक्रमण भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक उपोषण.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारी, प्रशासनातील दुर्लक्ष, भ्रष्टाचार तसेच वाढत्या अन्यायाविरोधात आज मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले.

या उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष अनेक मुद्द्यांकडे वेधण्यात आले—त्या मध्ये

१)सोलापूर शहरात २०–२५ वर्षांपूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन करणे सोलापूर शहरातील जुन्या नोंदी (स्कॅन करून) ऑनलाइन प्रणालीत समाविष्ट करून नुतन नोंद वही तयार करावी व सर्व रेकॉर्ड संगणकावर उपलब्ध करून नागरिकांना दाखले सहज मिळावेत, अशी ठाम मागणी.

२) दाखला कार्यालयातील नागरिकांची लूट तात्काळ थांबवावी जन्म-मृत्यू दाखले कार्यालयात नागरिकांकडून होणारी आर्थिक लूट, दलाली आणि गैरप्रकार तत्काळ बंद करण्याची मागणी.

३) १३/३ प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत नागरिकांचे दाखले प्रलंबित ठेवणे बंद करून 13/3 प्रकरणे तात्काळ निकालात काढून दाखले उपलब्ध करावेत, 

४) सोलापूर महापालिका  अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी

महानगरपालिका अतिक्रमण विभागातील पुर्ननियुक्त अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या पूर्वीच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करून  कारवाई करावी.

५) पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील बोगस गुन्ह्यांची चौकशी

सोलापूर शहरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व RTI कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणाऱ्या खोट्या, बोगस गुन्ह्यांची खातरजमा करून सखोल चौकशी करून  करावी.

 या सर्व विषय वर लाक्षणिक उपोषण पार पडला.   

 त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, राज्य अध्यक्ष प्रवीण चांदेकर,

 शहर संपर्कप्रमुख मिर महामुद खान, पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत,पत्रकार नरेश नागनाथ सब्बन, जय हो वृत्त पेपर चे संपादक विजय कुमार उघडे ,भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हाध्यक्ष सादीक इमाम मुजावर,ज़िल्हा कार्यअध्यक्ष मोहसीन खाजा बागवान,

जिल्हा प्रचार प्रमुख बंदे नावाज शेख,पत्रकार अमोल कुलकर्णी, पत्रकार महेबूब कादरी, उपस्थित होते.

संस्थेने स्पष्ट केले की, जर प्रशासनाने वरील मागण्यांवर तात्काळ ठोस कार्यवाही न केल्यास पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment