Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 15, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पदी युवा संपादक अमोल कुलकर्णी यांची निवड. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पदी महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे युवा संपादक अमोल कुलकर्णी यांची निवड केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार  कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब  मुजावर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवान यांनी दिली आहे 


*युवा संपादक अमोल कुलकर्णी यांचा अल्प परिचय*

 युवा संपादक अमोल कुलकर्णी हे सोलापूर येथील रहिवाशी त्यांनालहान पणापासून पत्रकारिता ची आवड होती त्यांनी पत्रकारिता बरोबरच अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतली असून सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत धावून त्यांना मदत करतात शांत संयमी व नेहमी हसतमुख असणाऱ्यां त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस वार्ता या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासकीय कार्यालयात मांडून त्यांची कामे मार्गी लावणाऱ्या संपादक अमोल कुलकर्णी यांच्यावर पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख या पदाची जबाबदारी दिली आहे युवा संपादक अमोल कुलकर्णी यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या शहर प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे त्याच बरोबर अनेकांनी अभिनंदन देखील केलं आहे.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment