सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार योद्धा यशवंत पवार यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश अध्यक्ष पदी एकमताने फेर निवड पत्रकारांमध्ये जल्लोष 1 जानेवारी रोजी सन्मान..
सोलापूर (प्रतिनिधी) :- गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वात आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश अध्यक्ष पदी यशवंत पवार यांची फेर नियुक्ती केल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून 1 जानेवारी नूतन वर्षी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांचा नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला जाणार असल्याची माहिती सत्कार केला पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर सचिव रमेश दग्गारी समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे
*जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांचा अल्प परिचय*
जेष्ठ पत्रकार यशवंत पवार हे गेली वीस वर्षापासून पत्रकारिता करत असून त्यांनी विविध दैनिकात काम केलं आहे राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या अडचणीत आजदेखील ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ते मोटारसायकलवर फिरून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत अनेक त्यांना ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांच्या व्यथा व अडचणी माहित आहेत त्यांचा जन्मच 6 जानेवारी (पत्रकार दिन ) या दिवशी झाला आहे मुळात आपलं जगणं केवळ पत्रकारांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी असून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपण महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण करत राहून पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकार च्या दरबारात मांडतात मुळातच पत्रकारिताची चाड असल्याने जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांना संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक पत्रकार म्हणून ओळखतो राज्यातील पत्रकार यशवंत पवार यांना पत्रकार योद्धा म्हणून संबोधतात जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांना पत्रकारांचे प्रश्न सोडवत असल्याने अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार हे सोलापूर येथील रहिवाशी असून ते गेली बारा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पहात आहेत त्याच बरोबर अवघ्या दोन वर्षात त्यांच्या कार्यसम्राट न्यूज नावाच्या ऑनलाईन पोर्टल ने तब्बल तीन लाख पंचेचाळी हजार वाचक वर्ग निर्माण केला आहे निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता त्यांच्या अंगी भिनली असून आपल्या ज्वलंत लेखणीच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे समाजातील रंजले गांजले शोषित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता यशवंत पवार यांनी पणाला लावली असून पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश अध्यक्ष फेर निवड झाल्याने त्यांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अभिनंदन केलं जात आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment