Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, December 16, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार सुरक्षा समिती – सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष पदी लोकशाही न्यूज 24 चे संपादक वसीमराजा बागवान यांची फेरनियुक्ती


सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा समिती – सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष पदी लोकशाही न्यूज 24 चे संपादक वसीमराजा बागवान यांची फेरनियुक्ती


सोलापूर (प्रतिनिधी) : - गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन, उपोषण, निवेदने व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी समान पेन्शन योजना, आरोग्य व विमा योजना, पत्रकारांसाठी घरकुल योजना, ग्रामीण भागातील पत्रकारांना एस.टी. बसमधून मोफत प्रवास, पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोल सवलत, राज्यातील युट्युब व पोर्टल पत्रकारांना शासकीय जाहिराती, जाहिरात यादीत नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील प्रकरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी व मारहाणीच्या घटनांवर ठोस भूमिका घेऊन पत्रकार सुरक्षा समिती प्रभावीपणे काम करत आहे.


या पार्श्वभूमीवर पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष पदी लोकशाही न्यूज 24 चे संपादक युवा पत्रकार वसीमराजा बागवान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

दि. ६ जानेवारी (पत्रकार दिनी) त्यांना ओळखपत्र, नियुक्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस, पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी व कार्याध्यक्ष राजू वग्गू यांनी दिली आहे.


युवा संपादक वसीमराजा बागवान यांचा अल्प परिचय


युवा संपादक वसीमराजा बागवान हे सोलापूर शहरातील रहिवासी असून ते सोलापूर जिल्हा बागवान जमात ट्रस्टचे मीडिया प्रमुख आहेत. त्यांनी जर्नलिझम व मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, पत्रकारितेतील सैद्धांतिक व प्रत्यक्ष अनुभवाची त्यांना भक्कम पार्श्वभूमी आहे. पत्रकारितेसोबतच ते ऑप्टोमेट्रिस्ट (नेत्रतज्ज्ञ) म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करण्याची विशेष आवड आहे.


ते लोकशाही फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहरासह कर्नाटक राज्यातील विविध भागांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे राबवत असून अनेक शाळा, झोपडपट्ट्या व स्काय मोहल्ल्यांमध्ये  सुमारे 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये यांनी 4800 पेशंट हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे. या शिबिरांमधून गरजू नागरिकांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले असून अनेक गरीब रुग्णांना मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात आली आहे.


लोकशाही न्यूज 24 या चॅनलच्या माध्यमातून ते शहरातील सामान्य नागरिक, वंचित, पीडित व अन्यायग्रस्तांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली असून विविध आंदोलन, उपोषण व निवेदनांमध्ये पुढाकार घेतला आहे.


त्यांच्या या सामाजिक, पत्रकारितेतील व आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने यावर्षीही वसीमराजा बागवान यांची फेरनियुक्ती केली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment