सारा न्यूज नेटवर्क -
श्री शारदीय नवरात्र महोत्सव - २०२६ ची जय्यत तयारी सुरू;
श्री महालक्ष्मी जागृत सिध्दपीठ मंदिर, राघवेंद्र नगर, सोलापूर
सोलापूर : - यंदाचा श्री शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी श्री महालक्ष्मी समाजसेवी संस्था व संशोधन न्यास ट्रस्ट सज्ज झाला आहे. राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार येथील श्री महालक्ष्मी जागृत सिध्दपीठ मंदिरात दि. ११ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन धुमाळ, उपाध्यक्ष श्री. संजय जाधव, उत्सव प्रमुख श्रीमती कमलाबाई कृष्णात शिंदे, श्री. प्रशांत हिरमुखे, सचिव श्री. हणमंत मोतीबने, खजिनदार श्री. धानय्या स्वामी, सहसचिव श्री. दत्तात्रय लाळसंगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा:
• रविवार दि. ११/१०/२६
- पालखी मिरवणूक सकाळी ८.३० पासून मिरवणुकीच्या वेळी आप आपल्या घरासमोर रांगोळी काढावे घटस्थापना ११.३० वा. देवी महात्मे ग्रंथ वाचन
दररोज सकाळी ७ ते ८
- राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार, श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ
सायंकाळी ४ ते ६ दररोज
सोमवार दि. १२/१०/२६
- प्रमुख उपस्थिती महिला मार्गदर्शन मा.डॉ. सौ. दिपाली काळे समादेशक रा.रा.पो. बल गट क्र. १० सोलापूर. कुंकमार्चना टीप- कुंकु, नाणे, डिश हे साहित्य सोबत आणावे.
-सायंकाळी ७.३० ते ०८
सायंकाळी ८ ते ९.३०
मंगळवार दि. १३/१०/२६
-भजन ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ (SRPF) संगित खुर्ची
-सायं. ४ ते ६ सायं. ७.३० ते ९.३०
-बुधवार दि. १४/१०/२६
-सादरिकरण पारंपारीक वेशभुषा, फॅन्सी ड्रेस इ. सहभाग
-सायंकाळी ७.३० ते ९.३०
गुरुवार दि. १५/१०/२६
- श्री प्रसाद प्र. पंडित (गुरुजी) अक्कलकोट व पुणे पीठसीन धर्माधिकारी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट (प्रज्ञापुरी मठ अक्कलकोट) प्राचिन वैदिक हिंदूधर्मशास्त्र परंपरेनुसार ज्योतिष व विश्वकर्मा वास्तु शास्त्र तसेच स्वभाव दोष निर्मूलन आणि तणावमुक्त आनंदी जीवन करिता अध्यात्मिक मार्गदर्शन.
सायंकाळी ७.३० ते ९.३०
शुक्रवार दि. १६/१०/२६
भजन ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ (SRPF) मुली विविध गुणदर्शन (कार्यक्रम नांव नोंदणी आवश्यक)
सायं. ४ ते ६ सायं. ७.३० ते ९.३०
शनिवार दि. १७/१०/२६
महिला विविध गुणदर्शन (कार्यक्रम नांव नोंदणी आवश्यक)
सायंकाळी ७.३० ते ९.३०
रविवार दि. १८/१०/२६
- आष्टमीहोम (होम मध्ये सहभाग सर्वांसाठी (श्री प्रसाद पंडीत यांची उपस्थिती) आष्टमी टिपरी
सकाळी १० ते १ पर्यंत
सायंकाळी ७.३० ते ९.३०
सोमवार दि. १९/१०/२६
नाटक (नव जुन जपुया)
सायंकाळी ७.३० ते ९.३०
मंगळवार दि. २०/१०/२६
सिमोलंघन
सायंकाळी ७ ते ९
रविवार दि. २५/१०/२६
कोजागीरी पोर्णीमा महोत्सव आरती व छबीना महाप्रसाद (प्रमख उपस्थिती श्री. दिलीप शिवाजी तडाखे समादेशक साहाय्यक गट क्र. १० सोलापूर)
सायंकाळी ६.४५ ते ७.३० सायंकाळी ७.३० ते ९.३०
दैनंदिन पूजा-अर्चा:
१) दररोज पहाटे ५.३० ते ६.४५ पर्यंत काकड आरती, अभिषेक, महापूजा व सायं. ६.४५ ते ७.३० आरती व छबिना .
२) दररोज सकाळी देवी महात्म्य पारायण सकाळी ७ ते ८ या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.
३) दररोज सायं. ६ ते ७ यावेळी राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार मधील महालक्ष्मी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम.
विशेष आवाहन:
ज्या भाविकांना देवीचा अभिषेक व महापूजा करावयाची असेल त्यांनी आपले नाव नोंदवून सव्वा रुपया १०१ ची पावती फाडावी. यात साडी १ वारी / ९ वारी / ब्लाउज पीस, ओटीचे साहित्य / मोठा हार १ / गजरा ४ / नारळ २ लिंबू २ / प्रसाद / फळे समाविष्ट असतील. संपर्क - वृंदाताई कुलकर्णी.
तसेच नवरात्र महोत्सवासाठी ज्या इच्छुक भाविकांना देणगी द्यावयाची आहे, त्यांनी मंदिराच्या कार्यालयात देणगी देऊन पावती घ्यावी. संपर्क - श्री. दत्तात्रय लाळसंगी, अंगडी सर, काशिनाथ पाटील सर, गुणापुरे सर, बुध्दवंत सर.
दि. २५/१०/२०२६ रोजी सायंकाळी कोजागिरी पौर्णिमे निमित्त महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. या मध्ये ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यांनी (गहू, तांदूळ, साखर, तेल, शेंगदाणा, तुरडाळ किंवा रोख रक्कम) स्वरूपात मदत करावी. महाप्रसादासाठी नागरिकांनी धान्य, रोख रक्कम कार्यालयात जमा करावेत. संपर्क - श्री. अंगडी सर, काशिनाथ पाटील सर.
दि. १४/१०/२५ रोजी विविध गुणदर्शनामध्ये भाग घेतलेल्या कलाकारांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. दिपाली कुलकर्णी, सौ. चंदाराणी ऐवळे यांचेकडे आपल्या कार्यक्रमाची माहिती पेनड्राईव्ह मध्ये सादर करावी.
जास्तीत जास्त महिलांनी पौर्णिमेच्या दिवशी महाआरती मध्ये सहभागी व्हावे.
पालखी मार्ग:
श्री महालक्ष्मी मंदिर ते आमने ते गवळी ते माने कदम ते शिंदे ते अंकुश ते पठाण ते रामनारायण चंडक विहार मोठा रोड ते ममदापुरे बेकरी कारखाना ते चंडक टायर गोडाऊन ते महालक्ष्मी मंदिर.
"झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, नव्या उमेदीने कामाला लागावे"
हा संदेश देत ट्रस्टने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, पालखी मार्गावरील भक्तांनी घरासमोर रांगोळी व फुले टाकून पालखीचे पूजन करावे.
वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजनासाठी संपर्क -
श्री भानुदास सुर्यवंशी (अध्यक्ष, स्वच्छता कमिटी, महालक्ष्मी मंदिर सोलापूर)
श्री. अनिल गावकरे, श्री. बालाजी रुपनर
संपर्क: 9403294848 / 9923022373 / 9923103498 / 8830695801



No comments:
Post a Comment