सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : महाएनजीओ फेडरेशन द्वारेआयोजित आढावा बैठक व सामाजिक संस्थांची कार्यशाळा सोनी महाविद्यालय,सोलापूर येथे पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात रोपांना पाणी टाकून करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय सहकार मंत्री सुभाष जी देशमुख व सोनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वासंती अय्यर,महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे,व्याख्याते गणेश बाकले सर,संचालक मुकुंद अण्णा शिंदे उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी आपले मनोगत व्यक्त करत समस्या व उपाय याविषयी चर्चासत्र झाले. व्याख्याते गणेश बाकले यांनी सामाजिक कार्यात झोकून कार्य कसे करायचे याविषयी मार्गदर्शन दिले व समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले तर माननीय आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांचे मनोगत ऐकून त्याचे शासन दरबारी व आपल्या परीने कसे सहकार्य करता येईल असा शब्द दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी इकोनेचर क्लब च्या माध्यमातून सोनी महाविद्यालय परिसरात जलपात्र लावण्यात आले.या प्रसंगी इकोनेचर क्लबचे प्रमुख मनोज देवकर, प्रियांका वाघमारे,अनिता पवार, किरण माशाळकर, पत्रकार सुरक्षा समितीचे राम हुंडारे,प्रवीण राठोड, रेवण कोळी ,पप्पु जमादार,मल्लिकार्जुन धुलखडे,अजित चव्हाण,अतिश शिरसाठ असे अनेक संस्थेचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज देवकर यांनी सांभाळले व संचालक अमोल उबंरजे यांनी महाएनजीओ फेडरेशन संस्थेची ओळख व कार्य याची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश कासट यांनी केले.
No comments:
Post a Comment