Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, April 27, 2023

सोलापुर शहरात शिवछत्रपती रंगभवन व इतर एस.टी.चा थांबा असलेल्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निवाराशेड,पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी...




सारा न्यूज नेटवर्क -

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापुर शहरात शिवछत्रपती रंगभवन येथे व इतरत्र एस.टी.चा थांबा असलेल्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निवाराशेड, पिण्यायोग्य पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था कडुन करण्यात आली. 

*मा.श्री भालेराव साहेब विभाग नियंत्रक,सोलापूर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ* यांना *जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था* च्या वतीने दिनांक २३ मार्च रोजी  महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री विश्वनाथ खटावकर  यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन दिले असता संबंधित विभागाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.



या संदर्भात पुनश्च एकदा दिनांक २६ एप्रिल रोजी *मा.श्री भालेराव साहेब विभाग नियंत्रक,सोलापूर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ* यांची त्यांच्या कार्यालयात श्री विश्वनाथ खटावकर, डॉक्टर निलेश खंडागळे यांनी प्रत्यक्षात भेट घेतली असता सदर भेटी दरम्यान संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान या विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार सुरू असल्याचे आणि लवकरच आपणास या बाबतची माहिती पत्राद्वारे कळविण्यात येईल असे श्री भालेराव साहेब यांचे कडून सांगण्यात आले.



No comments:

Post a Comment