Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 24, 2023

*'अन्नदान सर्वश्रेष्ठ दान'-रमजान-ईद निमित्त बी.एस.फाऊंडेशनच्या वतीने अन्नदानाचा संकल्प.*

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : रमजान ईद निमित्त सोलापूरातील बी एस फौंडेशच्या वतीने दररोज २ मस्जिद प्रमाणे महिनाभर एकूण ६० मस्जिद  मधील कष्टकरी, कामगार वर्गातील गरिबांना मोफत अन्नदान  केले जाते. अन्नदान वाटपाचे यंदाचे १० वे वर्ष असून बी.एस फौंडेशनचे सर्वेसर्वा अर्थात ज्यांना लोक बी. एस शेठ म्हणून ओळखात असे जेष्ठ अन्सार तांबोळी चाचा यांची ही अन्नदानाची संकल्पना आहे.या विधायक कार्यासाठी सोलापूरातील छोटे-मोठे व्यापारी व इतर क्षेत्रातील व्यक्तींनी आपापल्या परीने सहकार्य केले. 



यामध्ये अशपाक बागवान चाँदसाब बागवान,इस्माईल बागवान, फिरोज बागवान,हाजी साहब बॉम्बे सेफी, हार्डवेअर मरहुमदौला शेठ, विकास इंटरप्राईजेस, सिराज इंटरप्राईजेस,राठोड भाई,उमेर बागवान,गणीभाई,साबीर पिया, सालार ट्रेडर्स, सादिक कुरेशी, हिमालय फर्निच, सिंदगीकर ट्रेडर्स,मीरा फर्निचर,एजाज बागवान,अमीन बागवान, नबील एजन्सी, आसिफ ट्रेडर्स,सादिक लिंबूवाले, समीर भाई हुंडेकरी,सादिक इनामदार, जुबेर शेख, सय्यद फर्निचर,बशीर गोल्ड, राऊफ बागवान,ताज बेकरी,अल्लाबक्ष बेकरी,मुमताज बेकरी, संगम बेकरी, हाजीभाई आदींचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.



No comments:

Post a Comment