सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी): महावितरण थकबाकी वसुली मार्च २०२३ मध्ये सोलापूर मंडळ ( सर्कल ) हे बारामती परिमंडळ मध्ये प्रथम व पुणे प्रादेशिक विभाग मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता मा. श्री. संतोष सांगळे साहेब यांचे
तसेच शहर विभाग कार्यकारी अभियंता मा. श्री. आशिष मेहता साहेब यांचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, बारामती परिमंडळ सदस्य एम. एस. वाघमोडे, तानाजी चटके, शुकुर शेख, उत्तरेश्वर स्वामी, अनिलकुमार बनसोडे, संजय स्वामी, शिवलिंगप्पा हारगेरी व शिवशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment