Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, April 16, 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिका व प्राथमिक शिक्षण मंडळ सेवक गृहनिर्माण संस्थेतर्फे पाणपोई सुरू...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : नियोजित महानगरपालिका व प्राथमिक शिक्षण मंडळ सेवकांची गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालय (नवी पेठ) समोर पाणपोईचे उद्घाटन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. 



या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते चांगदेव सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, भालचंद्र साखरे हे उपस्थित होते याप्रसंगी पर्यवेक्षक सुरेश कासार, भगवान मुंडे, ताहीर कारभारी, केरबा माने, शिवाजी कांबळे, नितीन तळभंडारे, बापू सातपुते, प्रकाश पाडुळकर, गणेश अंजीखाणे, अजीम शेतसंधी, मेहबूब तांबोळी, नरसिंग चिप्पा, राजू उत्तरकर, सचिन साखरे आदी उपस्थितीत होते.



No comments:

Post a Comment