Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 21, 2023

सोलापूर रेल्वे स्थानकावरील वॉटर व्हेंडिग मशीन दुरुस्त करण्यात यावे यासाठी रेल्वे मंडळ अधिकारी यांना निवेदन सादर ....

 



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : प्रवाशांना (ग्राहक) अल्प दरात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सोलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर बसविण्यात आलेल्या वॉटर व्हेंडिंग मशीन गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. 



त्या दुरुस्त करून प्रवाशांच्या (ग्राहक) सेवेत कार्यरत क सेटरण्यात याव्यात म्हणून वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री एल. के. रणयेवले. यांना दिनांक २३ मार्च २०२३ रोजी जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेच्या वतीने श्री विश्वनाथ खटावकर प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली निवेदन दिले असता संबंधित विभागाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. या संदर्भात वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री एल. के. रणयेवले.यांची त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्षात भेट घेऊन संबंधित विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सहभागी श्री विश्वनाथ खटावकर, डॉक्टर निलेश खंडागळे व प्राध्यापक राजशेखर आळगीकर उपस्थित होते .



No comments:

Post a Comment