Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, June 19, 2023

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व सत्कार संपन्न ...




 सारा न्यूज नेटवर्क -

सोलापूर (प्रतिनिधी) : क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी मधील यशस्वी  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, हा कार्यक्रम श्री गीता मंदिर देवस्थान ट्रस्ट लोकसेवा हायस्कूल सोलापूर येथे करण्यात आला. 



 यावेळेस कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती  व समाज सेवक सुधीरजी खरटमल साहेब, माजी महापौर यु. एन बेरिया साहेब, निवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे मॅडम, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे साहेब, अलिपुर माजी सरपंच सुरेश कसबे, साक्षात लोखंडे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत (मेजर) उकरंडे साहेब, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे, नंदकिशोर दिडवाणी, बाळासाहेब लोंढे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे आधारस्तंभ इस्माईल (मुन्नाभाई) शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.





यावेळी मिनाक्षीताई पेठे, सुधीरजी खरटमल आणि यु. एन बेरिया साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण करुन त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे  आधारस्तंभ इस्माईल (मुन्नाभाई) शेख यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या शेवटी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी उपस्थित मान्यवराचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने  विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला.



सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment