सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करणारे सोलापूर (उत्तर) तहसीलमधील अभ्यासू मूळचे सोलापूर येथील रहिवासी असलेले सदाबहार व्यक्तिमत्व असलेले तहसीलदार सैफन नदाफ यांचा जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निराधार यासाठी लागणारे 21000/ ( एकवीस हजार रुपये) उत्पन्न दाखले याकरिता मंडल अधिकारी तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने ज्येष्ठ निराधार लोकांना कुठलाही त्रास होणार नाही दाखल्या करीता याची दखल घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हयात दाखले व 21000 उत्पन्न दाखल्यांचे सर्व अधिकाऱ्यांना सांगून चांगले नियोजन केल्याबद्दल उत्तर तहसीलचे तहसीलदार साहेब सैफन नदाफ यांचा जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जी के संस्था अध्यक्ष संतोष दादा गायकवाड, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, जी के संस्था कार्यकारी सदस्य राहुल निम्मंल, जी के संस्था सदस्य ईश्वर बेलभंडारे, सदस्य योगेश शिंदे, सदस्य मल्लू क्षिसागर, महिला सदस्य सरस्वती बोरकर या सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी GK बहुद्देशीय संशोधन संस्था सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment